मंगलवार, 30 जून 2015


Blood Donation Camp was held on June 25, 2015  and Publication of Poetry Collection 'Mayur Swapna' In the Memory of Our Pious Father Late Agriculture Expert Shri M. P. Sanap Saheb at Jankalyan Blood Bank, Gangapur Road, Nashik.
स्वर्गीय कृषीतज्ञ श्री महादेव पाटीलबा सानप (एम. पी. सानप साहेब) यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर व ‘मयूर स्वप्न’ काव्यसंग्रहाच्या नवीन आवृत्तीचे लोकार्पण संपन्न :
स्वर्गीय कृषीतज्ञ श्री महादेव पाटीलबा सानप (एम. पी. सानप साहेब) यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त गुरुवार दिनांक २५ जून २०१५ रोजी सकाळी १०:३० ते सायं. ५:३० या वेळात संयोजक अॅड. श्री. आनंद महादेव सानप व परिवार, नाशिक यांच्या वतीने जनकल्याण रक्तपेढी, गंगापूर रोड, नाशिक येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी सकाळी ११:०० वाजता जनकल्याण रक्तपेढी येथे स्व. कृषीतज्ञ श्री महादेव पाटीलबा सानप (एम. पी. सानप साहेब) यांच्या स्मरणार्थ अॅड. श्री. आनंद महादेव सानप यांनी स्वतः रक्तदान करुन देणगी प्रदान केली आणि वडिलांच्या 'मयूर स्वप्न' या काव्यसंग्रहाचे लोकार्पण केले. यावेळी संयोजक अॅड. श्री. आनंद महादेव सानप, श्रीमती प्रमिला महादेव सानप, प्रा. कु. संज्योती महादेव सानप, रक्तदाते श्री. संतोष फडके, श्री. शरद काळे आणि जनकल्याण रक्तपेढीचे पदाधिकारी श्री. सच्चिदानंद फाटक, श्री. विनय शौचे, डॉ. विनिता देशपांडे, डॉ. मर्चंट, श्री. अरुण कुलकर्णी, श्री. प्रदीप देशमुख व कर्मचारी उपस्थित होते. अनेक रक्तदात्यांनी नियोजित वेळेत रक्तदान करून मानवीय संवेदनेचा आदर्श समाजासमोर ठेवला. या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले रक्तदाते श्री. संतोष फडके, श्री. शरद काळे, अॅड. श्री. आनंद महादेव सानप, श्री. श्रीपाद पांडे, श्री. अक्षय शर्मा, श्री. मंदार जाखडी, श्री. तुषार जोशी, श्री. अभिलाष जोशी, पुष्कर वेढणे,श्री. भूपेश मुळे, श्री श्रीकांत देवरे इत्यादि.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें