मंगलवार, 10 जुलाई 2018

स्वर्गीय कृषीतज्ञ मा. श्री. महादेवराव पाटीलबा सानप यांच्या पंचम् पुण्यतिथी निमित्त पाचवे रक्तदान शिबिर संपन्न

आमचे परमपूज्य वडील स्वर्गीय कृषीतज्ञ मा. श्री. महादेवराव पाटीलबा सानप यांच्या पंचम् पुण्यतिथी निमित्त सोमवार, दिनांक 25 जून  2018 रोजी सकाळी 10 ते सायं 5  या वेळात जनकल्याण रक्तपेढी, 3, श्रीनगर , जुना गंगापुर नाका, गंगापुर रोड, नाशिक येथे पाचवे रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन अॅड. श्री. आनंद महादेवराव सानप आणि परिवार व मयूर स्वप्न प्रकाशन तर्फे करण्यात आले. तत्प्रसंगी अॅड. श्री. आनंद महादेवराव सानप यांनी स्वतः रक्तदान करून जनकल्याण रक्तपेढीच्या मानवतावादी कार्यास रुपये 21,000/- देणगी प्रदान केली. यावेळी प्रा. कु. संज्योती महादेवराव सानप, श्री. संतोष फडके, श्री. सागर धात्रक यांनी रक्तदान केले. याप्रसंगी अॅड. श्री. आनंद महादेवराव सानप यांच्या मातोश्री श्रीमती प्रमिलाताई महादेवराव सानप, बहिण प्रा. कु. संज्योती महादेवराव सानप आणि जनकल्याण रक्तपेढिचे श्री. विनय शौचे, डॉ. नीता ठाकरे, श्री. अरुण कुलकर्णी, श्री. संजय कुलकर्णी, श्री.प्रसाद नातु, श्री. प्रदीप देशमुख, श्रीमती ज्योती सरोदे, श्रीमती वृषाली कांदळकर, श्री. अमोल नेहे, श्रीमती ज्योती चव्हाण, श्री. वाल्मीक वाळुंज, श्रीमती वर्षा पिंपळे, श्रीमती रेश्मा गायकवाड, श्रीमती स्नेहा जोशी, श्रीमती नीता पाटील, श्री. साईनाथ शेलार,श्री. निलेश करंदीकर, श्री. लक्ष्मण गवळी इत्यादि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें