स्वर्गीय कृषीतज्ञ श्री महादेवराव पाटीलबा सानप (एम. पी. सानप साहेब) यांच्या सहाव्या पुण्यतिथी निमित्त मंगळवार दिनांक २५ जून २०१९ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात संयोजक अॅड. श्री. आनंद महादेवराव सानप व परिवार, नाशिक यांच्या वतीने जनकल्याण रक्तपेढी, गंगापूर रोड, नाशिक येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी स्वर्गीय कृषीतज्ञ श्री. महादेवराव पाटीलबा सानप (एम. पी. सानप साहेब) यांच्या स्मरणार्थ अॅड. श्री. आनंद महादेवराव सानप यांनी स्वतः रक्तदान करुन सानप परिवाराच्या वतीने रक्तदानाच्या मानवतावादी कार्यास समर्पित जनकल्याण रक्तपेढीस ₹२५०००/- (पंचवीस हजार) रुपयांचा धनादेश देणगी स्वरुपात अर्पण केला. यावेळी संयोजक अॅड. श्री. आनंद महादेवराव सानप, श्रीमती प्रमिला महादेवराव सानप, प्रा. कु. संज्योती महादेवराव सानप आणि जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष श्री. राजेश दादासाहेब रत्नपारखी, प्रशासकीय अधिकारी श्री. विनय शौचे, डॉ. सौ. सुजाता सोनवणे, डॉ. यंदे, डॉ. मिलिंद राठी, डॉ. सौ. देशपांडे, सौ. कांदळकर, श्री. प्रदीप देशमुख, श्री. रवींद्र सहारे आणि कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी एकूण आठ रक्तदाते श्री. आनंद महादेवराव सानप, सौ. ज्योती सरोदे, श्री. दिग्विजय रेड्डी, श्री. अमित नाईकवाडी, श्री. आशिष देवरे, श्री. मुकेश कांबळे, श्री. सचिन खिंवसरा आणि श्री. रवींद्र वाघ यांनी नियोजित वेळेत रक्तदान करून मानवीय संवेदनेचा आदर्श समाजासमोर ठेवला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें